Blog Detail

कुंकूमार्चनाचे महत्त्व काय आहे त्यामुळे काय फायदे होतात या संदर्भात अधिक माहिती

कुंकूमार्चन :
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे, त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, एश्वर्य देते. कुंकूमार्चन श्रीयंत्रावर करतात.
देवतांच्या पूजेत परिमल द्रव्य म्हणून अष्टगंधाचा उपयोग करतात. त्यात हळद व कुंकू ही दोन मुख्य गंधद्रव्ये आहेत.  रामप्रभूंनी रावण व कुंभकर्ण यांना मारल्यानंतर आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. त्यामुळे त्यांची ज्योत सभोवती फ़िरत होती. तेव्हा रामांनी त्यांना बजावले की, मी जेव्हा केदारनाथाचा अवतार घेईन त्यावेळी माझ्याशी विरोधी भक्ती करावी म्हणजे तुम्हांला मोक्ष प्राप्त होईल. रामानी अवतार घेतल्यानंतर राक्षसांचा वध केला. त्यात जलसेना व चंद्रसेना यांचा वध झाला. त्या पतिव्रता स्त्रिया होत्या. देवांना अत्यंत वाईट वाटले. त्या स्त्रियांनी वर मागितला. देवांनी दिला तो, ‘ हळद - कुंकू ही द्रव्ये स्त्रियांनी लावावीत, तरच त्या सौभाग्यवती, सुवासिनी स्त्रिया मानल्या जातील. ’ असा वर देऊन नेमाला दंडक घातला. तेव्हापासून स्त्रियांचे मानचिन्ह झाले. मात्र गतधवा  ( विधवा ) स्त्रीने नवरा वारल्यानंतर हळद - कुंकू लावले तर तिची उभय कुळे नरककुंडात सात जन्म पडतील. यासाठी पतिनिधनानंतर स्त्रिया हळद - कुंकू लावीत नाहीत.

जी सौभाग्यवती स्त्री कपाळी कुंकू लावीत नाही, त्या दुर्भागीचे तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे पाप नष्ट होते.देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय.

 कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु सुपारी,यंत्र,
ताम्हणात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. अथवा कुंकवाने स्नान घालावे.
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.
जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
कुंकुमार्चन करण्यासाठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा , अमावस्या , गुरुपुष्यामृत योग ,लक्ष्मीपुजन , मंगळवार , शुक्रवार निवड करावी.
‘मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली अाहे. शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून येणारया सुवासास शक्ती  आकृष्ट होते.या सुवासाने देवी प्रसन्न होते.म्हणून. देवीच्या पुजेत कुंकवाला फार मोठे स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हा कुंकवा सारखा आहे.म्हणुन देवीला कुंकू लावले की देवी जागृत होते.
देवीसहस्त्रनाम म्हणत देवीला कुंकू अर्पण केल्यास देवी लवकर प्रसन्न होते.

पोर्णिमा :- पोर्णिमा म्हणजे सर्व विश्वाचे पुर्णत्व आहे.या दिवशी कुंकूमार्चन केल्यास ते पुर्णत्वास जाते.आशी ही सर्वोत्तम कुलोपचार  साधना आहे म्हणुन दरपौणिमेला
कुलस्वामिनीला कुंकूमार्चन करावे.म्हणजे घराला पूर्णत्व येते.

  दुर्गाष्टमी:- आमावास्ये नंतर येणारी शुक्ल अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी या दिवशी देवीचे अष्टभाव जागृत होतात. म्हणुन या  दिवशी सकाळी किंवा रात्री कुंकु मार्चन करावे ज्या मुर्तीवर कुंकुमार्चन केले आहे ती मुर्ती दिवस आणि रात्रभर त्या कुंकवा मधेच ठेवावी सकाळी ती मुर्ती कुंकवामधुन बाहेर काढुन नित्य पुजेत घ्यावी व ते कुंकु सुरक्षित ठेवावे.ते रोजच्या वापरात घ्यावे,रोज कपाळावर लावावे, त्यामुळे अपशकुन घडत नाही.तसेच
घराच्या उंबऱ्यावर ते कुंकू ओले करुन तीन पट्टे ओढावेत त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करु शकत नाही.तसेच घरातुन बाहेर पडताना यातील कुंकु  कपाळावर लावुनच बाहेर पडावे व एक कुंकूवाची पुडी करून सतत जवळ ठेवावी,त्यामुळे कारण मारण,करणीबाधा हा दोष.लागत नाही.

‘देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वाहतात.’ –

हे देवीतत्त्व आहे.....
  ●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬●