Blog Detail

तुळजापूर मंदिर ची विशेष माहिती: तुळजा भवानी मंदिर

तुळजापूर स्थान हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र तर आहेच त्यात काय दुमत नाही, इतकेच काय तर तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्याचे ओळखपत्र देखील आहे आणि या शहराला महत्व प्राप्त झाले आहे तुळजाभवानी देवी मुळे, तुळजाभवानी ही समस्थ महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी आणि हिचा बद्दल न जाणणारा व्यक्ती परग्रहावरील मानावा लागेल.

तुळजापूर स्थान उस्मानाबाद येथून सुमारे 22 आणि सोलापूर येथून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तुळजापूर शहर रस्तेमार्गाने इतर शहरांशी व्यवस्थितपणे जोडले गेलेले आहे.

तुळजापूर तीर्थ समुद्र सपाटी पासून अंदाजे 26000 ft उंचीवर आहे,येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगररांगेत वसलेले आहे,येथे चिंचेची झाडे मुबलक असल्याने पुराणकाळात याचे नाव चिंचापुर असे होते कालांतराने हे नाव बदलून तुळजाभवानी माते वरून तुळजापूर असे झाले

समस्त महाराष्टाची कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे.सम्पूर्ण देशातून भाविक मोठ्या भक्तिभावाने तुळजापूर येथे दर्शनासाठी येतात.कलयुगात छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्त तरिणी आणि वर प्रसादिनी आहे.उस्मानाबाद आणि सोलापूर ही जवळची रेल्वेस्थानके तुळजापूर येथे पोहचण्यासाठी आहेत

 • जगदंबा ,तुळजाभवानी समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही साक्षात पार्वती चे रूप आहे. अतिशय जागृत अशा या तीर्थास महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील भाविक मुखत्वे करून येतात .तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला बाजारपेठेतून जावे लागते .देवीचा महिमा वर्णन करणाऱ्या कॅसेट्स आणि विविध स्वरुपातील ध्वनिफिती या बाजारात मिळतात.देवीची गाणी ऐकत ऐकत आपण मंदिरात प्रवेश करतो. बाजारपेठेत आपणास देवीचा मूर्ती, फोटो ,पूजेची साहित्य, लहान मुलांची खेळणी व इतर साहित्य सहज मिळू शकते

मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. राजे शहाजी आणि राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार. त्यापैकी राजे शहाजी प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे .त्या शेजारी पर्यायाने लहान प्रवेशद्वार सुद्धा उगयोगास आणण्यात येते.या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला कल्लोळ तीर्थ आणि डाव्या बाजूला गोमुख तीर्थ आहे. भाविक मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी अंघोळ किंवा हात पाय धुवून प्रवासाचा क्षीण घालवतात

 • गोमुख तीर्थाचा समोरच्या बाजूला दत्त मंदिर आहे, या मंदिरात दत्ताची पादुका आणि महादेवाची पिंड आहे.मंदिर प्रांगणात प्रवेश करण्याचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे आणि उजव्या बाजूला आदिशक्ती आदिमाया मार्तंग देवीचे मंदिर आहे, या ठिकाणी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे.श्री तुळजाभवानी मंदिराचा मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार असे संबोधतात,या प्रवेशद्वारातून खाली पायऱ्या उतरून जाताना डाव्या बाजूला मार्केन्डेय ऋषींचे एक छोटेसे मंदिर आहे .पायऱ्या उतरून खाली गेल्यावर श्री तुळजाभवानी मंदिर आहे, हा परिसर प्रशस्त आणि मोठा आहे.श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात समोरच यज्ञमंडप आहे ,नवरात्रात या ठिकाणी शतचंडी यज्ञ होतो.तुळजाभवानी मातेचा मंदिरात मूर्ती समोर गाभाऱ्यात भवानी शंकराचे छोटेसे मंदिर आहे.मूर्ती समोर महादेवाची पिंड आणि नंदी आहे.या मंदिराच्या समोरच दोन पितळी घंटा आहेत येथे लग्न मुंजी इत्यादी कार्यक्रम आयोजित होतात.श्री क्षेत्र तुळजापूर येथे असलेली मूर्ती काळ्या पाषाणाची आहे ,ही मूर्ती स्वयंभू आहे .अष्टभुजा देवी सिंहासनावर उभी आहे ,साधारणपणे ही मूर्ती 3ft उंचीची आहे.मस्तकावर मुकुट आहे ,त्याखालून बट बाहेर आलेली आहेत.देवी अष्टभुजा असून आठ हातात त्रिशूळ, चक्र,बिचवा,शंख,धनुष्य,पान पत्र,बाण आणि राक्षसाची शेंडी अशी आयुधं आहेत.पाठीवर बाणांचा भाता आहे. देवीच्या मुखाचा डाव्या व उजव्या बाजूस चंद्र सूर्य आहेत.देवीचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर आहे.त्याखाली एका बाजूला सिंह आणि त्याखाली मार्केन्डेय ऋषी आहे.देवीचा डावा पाय जमिनीवर असून दोन्ही पायांचा मध्ये तुटलेले महिष मस्तक आहे.देवीचा शृंगारामुळे देवीचे आठ हात आणि त्यातील आयुधं भक्तांचा नजरेस पडत नाहीत.तुळजाभवानी मातेचा मंदिराचा मुख्य दरवाजा चांदीचा पत्र्याने मधवलेला आहे ,त्यावर सुरेख असे नक्षीकाम केलेले आहे.देवीच्या मूर्तीला रोज दही दुधाचा अभिषेक असतो.नवरात्रात सर्व अलंकार घालून देवीची पूजा करण्यात येते.

 • देवीचा अभिषेकानंतर देवीला मंदिरात परिसरात रण चोडबोलावण्याची प्राचीन प्रथा आजही पाळली जाते.मंदिराचा मागचा अंगणात घंटा नाद केला जातो.देवीच्या बरोबर मागचा बाजूला छत्रपती शिवाजी दरवाजा आहे, या दरवाजातून आत जात असताना वरचा बाजूला एक सुरेख असे चित्र आहे, त्यात प्रत्यक्ष भवानी माता छत्रपती शिवाजी राजांना भवानी तलवार देत आहे.याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज ये जा करीत असत.या दरवाजात येऊन मंदिराचा प्रथे प्रमाणे मंदिराचे पुजारी देवीला मोठ्याने हाक मारून बोलावतात.

 • देवीचा मंदिराचा अगदी मागचा बाजूस भारती बुवांचा मठ आहे ,आपण जर मठात असू तर ही हाक आपणास स्पष्टपणे ऐकू येते.या मठाचा परिसरात रण छोड भारती बुवांची जीवन्त समाधी आहे,तसेच भारती बुवांचे वंशज श्री गोविंद भारती ,गणेश भारती आणि गजेंद्र भारती यांचा समाध्या पण सभोवताली आहेत.मठाचा मागचा बाजूला एक भुयार आहे ,छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मार्गाचा वापर करून मंदिरात प्रवेश केला होता.मठाचा मागचा बाजूला काशी कुंड आहे ,या कुंडाचा एका बाजूला कोपऱ्यात महादेवाची पिंड आहे,दर सोमवती आमावसेला काशीहून गंगा येथील कुंडात अवतरीत होते आणि कोपऱ्यात पिंडीपर्यंत पाणी येते अशा प्रकारे पिंडीचा अभिषेक करून पाणी कमी होते.श्री भारती बुवांचा मठात देवीची सारीपाट खेळण्याची जागा आहे. आपल्या तपोबळाने बुवा देवीशी प्रत्यक्ष बोलत असत असे मानले जाते.

 • श्री तुळजाभवानी मातेचा मूर्तीला हात लावून दर्शन घेण्याची मनाई आहे ,भाविकांना दर्शनाचा लाभ दुरूनच घ्यावा लागतो.देवीचा समोरच्या बाजूला संगमरवरी दगडाचा सिंह आहे आणि उजवीकडे माताजींचा पलंग आहे .

 • श्री तुळजाभवानी मातेचा मुख्य मंदिर परिसरात अनेक छोटे मंदिरे आहेत ,जसे यमाई देवीचे मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर ,दत्त मंदिर ,खनडोबा मंदिर इत्यादी.मंदिर गाभाऱ्याच्या मागचा बाजूला उजवीकडे कोपऱ्यात चिंतामणी आहे.याचा आकार गोल आहे आणि हा काळ्या दगडापासून बनलेला आहे. यात्रेकरू आपले काम होणार का नाही ते यावर हात ठेवून विचारतात .हा चिंतामणी जर उजवीकडे फिरला तर मनातील इच्छा पूर्ण होणार ,डावीकडे फिरला तर नकार आणि स्थिर राहिला तर अनिश्चितता असे समजावे.छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा युद्धावर जाण्यापूर्वी या चिंतामणी चा कौल घेत असत असे मानले जाते.श्री तुळजाभवानी मातेचा मंदिराचा डाव्या बाजूला टोळभैरव मंदिर आहे,या मंदिराचे बांधकाम दगडी आहे.टोलभैरवाची मूर्ती या ठिकाणी आहे ,या मूर्तीला तेलाचा अभिषेक केला जातो.श्री तुळजाभवानी मातेचा मंदिराचा दक्षिण बाजूला डोंगरावर कालभैरव मंदिर आहे.श्री तुळजाभवानी माता मंदिराचा दक्षिण बाजूला महंत बाबूजी बुवांचा मठ आहे ,तुळजाई मातेचा मंदिराचा जिजाऊ महाद्वाराच्या डाव्या बाजूला आहे महंत गरीबनाथ मठ किंवा दशावतार मठ.या मठात गरीबनाथ महाराजांची समाधी आहे.मठात मागे इंगळमाता देवीची मूर्ती आहे.

 • तुळजापूर नगराचा दक्षिणेकडे बालाघाट डोंगरावर पापनाश तीर्थ आहे,हे तीर्थ तुळजापूर हुन सोलापूर ला जाताना उजवीकडे विवेकानंद महाविद्यालयकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे चालून गेल्यावर आहे.तुळजापूर येथील घाटशील डोंगर कड्याखाली काही अंतरावर दाट झाडीत ओढा काठी मुदगलेश्वराचे मंदिर आहे.,या मंदिरात मोठे शिवलिंग आहे .श्रावण महिन्यात येथे गर्दी असते आणि अभिषेक केला जातो.

 • भारती बुवांचा मठाचा मागचा बाजूला डोंगरउतारावर बारालिंगी मंदिर आहे.पुरातन काळी श्री गुरू गोविंद यांना सिद्धी प्राप्त झाल्यामुळेया बारा लिंगाचे

दर्शन त्यांना झाले ,ही बारा लिंगे सर्व एकाच ठिकाणी आहेत .

 • सोलापूर हुन तुळजापूर कडे येताना वाटेत घाटात घाटशील मंदिर आहे.येथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या केलेल्या आहेत.श्री रामप्रभु वनवासाला असतानवणाने सीता मातेचे अपहरण केले.श्री राम सीता मातेचा शोध घेत तुळजापूर येथे आले त्यावेळी देवीने सीतेचे रूप घेतलेपरंतु श्री रामाने देवीस ओळखले .त्यावेळी देवीने एका शिळेवर उभा राहून लंकेकडे जाणारा मार्ग दाखवला. देवपाऊले आजही एका शिळेवर उमटलेली आहेत

 • तुळजाभवानी देवी बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की जेव्हा राम सीता लक्ष्मण वनवासाला होते तेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले ,त्यानंतर दुःखी व वियोगाने व्याकूळ राम सीतेचा शोधासाठी दंडकारण्यातून या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी सीतेचा शोधात यशस्वी होण्यासाठी तप केले

,देवीने प्रसन्न होवून त्यांना यशस्वी होण्याचे वरदान दिले तसेच लंकेकडे जाण्यासाठी मार्ग दाखवला म्हणून देवीला त्वरिता ,रामवरदायीनी असेही म्हणतात.

 • देवीची अजून एक आख्यायिका सांगितली जाते की फार पुरातन काळी ऋषीमुनी जंगलात वास्तव्य करीत व जप तप इत्यादी साधनेने देवांना प्रसन्न करून घेत आणि इच्छित वरदान देवतेकडून प्राप्त करून घेत हे दृष्ट दानवांना बघवत नसे म्हणून ते त्यांना येनकेन प्रकारे विघ्न निर्माण करून त्रास देत. असेच एक ऋषी दंडकारण्यात आपल्या पत्नी सोबत वास्तव करीत .दिवसभर जप तप होमहवन आदी क्रियेतून पुण्यसंचय करीत .त्यांचे नाव कर्दम ऋषी आणि त्यांचा पत्नीचे नाव अनुभूती.कालांतराने कर्दम ऋषींचे निधन झाले,त्यावेळी अनुभूतीने सती न जाता मेरू पर्वतावर जाऊन ध्यानसाधना प्रारंभ केली तेव्हा दैत्यराज कुकुर ला अनुभूती नजरेस पडली ,तो तिचा रूपावर भाळला.स्वतःच्या पावित्र्याचा रक्षणासाठी तिने देवीचा धावा केला. तेव्हा देवीने त्वरित येवून कर्दम चा वध केला आणि तुळजाभवानी या रूपाने कायम वास्तव्य केले

 • अग्निदेवते चा कृपाप्रसादाने झालेला रंभ दैत्याचा पुत्र महिषासुर याने कठोर अशी तपचर्या करून ब्रह्मा कडून वरदान प्राप्त केले.या वरदान मुळे तो उन्मत्त झाला, त्याने देवतांना ,मानवाला ,पशूंना ,ऋषींना त्रास देण्यास सुरुवात केली .पृथ्वीवर होमहवन, पूजाअर्चा करण्यास मनाई केली. त्याचा या उन्मत्त वागण्यामुळे सर्व धरती हैराण झाली होती तेव्हा तुळजाभवानी देवीने माजलेल्या दैत्याचा वध केला आणि धरती महिषासुराचा संकटापासून मुक्त केली.

अशा या भक्तवत्सल, महिषासुरमर्दिनी देवीचा मोठा उत्सव नवरात्रात साजरा करण्यात येतो.समस्त भारत देशातील भक्त मोठ्या मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.तुळजाभवानी मंदिर तुळजापुरात नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठराविक कार्यक्रम पार पाडण्यात येतो जसे की पहिल्या दिवशी घटस्थापना होवून नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होतो तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असून या निमित्ताने देवीचा मंदीरात मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो.अश्विन प्रतिप्रदेपासून उत्सवाला सुरुवात होते.पौराणिक कथे अनुसार महिषासुर राक्षसासोबत देवीचे तुंबळ युद्ध होवून दमल्याने देवी मंचकी निद्रेस जाते.दहाव्या दिवशी नवरात्र संपताच विजयादशमी मंदीरात उत्साहात साजरी केली जाते. विजयादशमीच्या दिवशी पहाटे देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बऱ्हाणपूर येथून पालकी व भिंगार येथून पलंग आणला जातो त्यानंतर देवीची पालखीत मिरवणूक होवून पलंगावर निद्रेसाठी झोपवण्यात येते.दसरा हा सण मोठ्या उत्साहात मंदिरात साजरा केला जातो .तुळजाई मातेचा नवरात्र उत्सवात आठव्या दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार पूजा करण्यात येते.त्यादिवशी लाखो भाविक याची देहा याची डोळा दोन महाशक्तींचा संगम अनुभवतात ,एक आदिशक्ती, आदिमाय तुळजाभवानी देवी आणि दुसरे म्हणजे निश्चयाचे महामेरू छत्रपती शिवाजी महाराज.अभिषेक पूजेनंतर रात्री उदो उदो चा उदोकारात देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येते.तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती रथात ठेवून मंदिर सभोवताली छबिण्याचा वाहनातून मिरवणूक काढण्यात येते.अशा रितीने सम्पूर्ण विधी अनुसार नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा मंदिर देवस्थान पार पाडते.